मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. दुपारी 12 वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही भेट होणार असल्याचं समजतंय. 

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अनधिकृत फेरीवाल्यांचा विषय ऐरणीवर आणला. काँग्रेसने फेरीवाल्याच्या बाजूने मैदानात उडी घेतल्याने हा विषय पेटला आहे. 

दरम्यान, काल एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. ही शुद्ध राजकीय बदमाशी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.