बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अयोध्या दौरा स्थगित होताच राज ठाकरेंच्या तब्येतीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा तुर्तास स्थगित झाला असल्याची माहिती खुद्द राज ठाकरे यांनी ट्विट करत दिली. तब्येतीच्या कारणांमुळे हा दौरा स्थगित केला असल्याचं म्हटलं जात असताना राज ठाकरेंच्या तब्येतीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

राज ठाकरे यांच्या पायावर पुढच्या आठवड्यात शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaokar) यांनी दिली आहे. राज ठाकरेंना पायाचा त्रास जाणवत असल्यानेच त्यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे.

साधारण एक ते दीड वर्षांपूर्वी राज ठाकरेंच्या पायाला दुखापत झाली होती. तेव्हापासूनच राज ठाकरेंना पायाचा त्रास जाणवू लागला आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी अयोध्या दौरा तुर्तास स्थगित केल्यानंतर उलट सुलट चर्चा रंगायला सुरूवात झाली. यावर बोलताना राज ठाकरे 22 मे रोजी पुण्यात सभा घेणार असून ते अयोध्या दौरा स्थगित केल्याबद्दल बोलतील. उलट सुलट चर्चा करण्याचं काहीच कारण नाही, असंही बाळा नांदगावकर म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

सर्वात मोठी बातमी! राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित

बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ; लालू प्रसादांच्या घरी सकाळी सकाळीच…

युक्रेनमधून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर; शेकडो सैनिकांची रशियापुढे शरणागती

मोठी बातमी! संभाजीराजेंसाठी शिवसेना खेळी करण्याची शक्यता!

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More