मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला होता. राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेमध्ये बोलताना येत्या 1 तारखेला हिप बोनची शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती दिली होती. राज ठाकरेंना शस्त्रक्रियेनंतर दोन महिने विश्रांती घ्यावी लागणार आहे.
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. राज ठाकरे यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे भोंग्याबाबतचे आंदोलन शांत होण्याची शक्यता आहे. आपण आरोग्यासंदर्भात पथ्य खूप गांभीर्याने घ्यायला पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.
मी खरंतर बॅडमिंटन खेळणारा, क्रिकेट, टेनिस खेळणारा आहे. परंतु, सध्या मला कोणताही व्यायाम करता येत नाही, असं राज ठाकरे म्हणाले होते. आपण आज करू, उद्या करू या गोष्टीमध्ये कायम टाळाटाळ करत राहिलो. मला सध्या या गोष्टींचा त्रास होत असल्यामुळे या सगळ्याची जाणीव होत आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. त्यावर राज ठाकरे यांनी हे सगळे एक आहेत आणि माझा दौरा अयशस्वी होण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली, असं म्हटलंय.
थोडक्यात बातम्या-
उदयनराजेंनी रस्त्यावरील मुलीकडून सगळी पुस्तके विकत घेतली, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
‘मी माझे कपडे विकून लोकांना…’; पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं मोठं वक्तव्य
“किमान राजघराण्यातील व्यक्तींनी संज्यासारख्या फडतूस माणसाला…”
“नितीन गडकरी पंतप्रधान झाले असते तर रोजी रोटीचा प्रश्न मिटला असता”
मोठी बातमी! अखेर सिद्धू मूसेवाला याच्या हत्येचं कारण आलं समोर
Comments are closed.