मनोरंजन

‘पानिपत’चा ट्रेलर पाहून राज ठाकरे म्हणतात..

मुंबई | आशुतोष गोवारीकर यांचा ‘पानिपत – द ग्रेट बेट्रेयल’ हा चित्रपट डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात प्रदर्शित होतो आहे. त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे.

गोवारीकरांच्या चित्रपटाचा ट्रेलर राज ठाकरेंना आवडला असून ट्विट करत त्यांनी ट्रेलरची प्रशंसा केली आहे.दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या लढाईवरचा ‘पानिपत’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच पाहिला. ट्रेलरच इतका सुंदर आहे की चित्रपटाची लढाई आशुतोष जिंकणार याची खात्री आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

अटकेपार पोहोचलेल्या मराठय़ांनी लढलेल्या सर्वात मोठय़ा लढाईची गोष्ट या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर उलगडणार असल्याने या चित्रपटाबद्दल उत्सुकताही आहे. तसेच या चित्रपटात सदाशिवराव भाऊंच्या व्यक्तिरेखेला अर्जुन कपूर किती न्याय देऊ शकेल, यावरून समाजमाध्यमांवर चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान,  ट्रेलरसोबतच चित्रपटदेखील पाहण्याचे आवाहन राज यांनी या ट्विटद्वारे केलं आहे.

 

 https://www.youtube.com/watch?v=_zb1og49P9g

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या