“3 तारखेपर्यंत भोंगे उतरवा अन्यथा…”; राज ठाकरेंचा सरकारला अल्टीमेटम
ठाणे | पाडव्या मेळाव्यातील भाषनानंतर राज्यात मोठा राजकीय संघर्ष वाढलेला आहे. भोंग्याला विरोध म्हणून हनूमान चालीसा लावण्याचा राज ठाकरेंचा निर्धार परत एकदा ठाण्यातील सभेत पक्का झाला आहे. ठाण्यातील उत्तर सभेतून राज ठाकरेंनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
3 मे पर्यंत राज्यातील सर्व मस्जिदीवरील भोंग उतरवा, आम्हाला कुठलीही तेढ निर्माण करायची नाही, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. राज्याच्या गृहखात्यानं लवकरात लवकर भोंग्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीनं काम करू, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
सर्वोच्च न्यायालयानं भोंग्याबाबत निकाल दिल्यानंतर राज्य सरकारला काय हरकत आहे. राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचं ऐकवं, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. परिणामी आता राज्यात कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
थोडक्यात बातम्या –
“वसंत सेना ते पवार सेना असा शिवसेनेचा प्रवास”, संदीप देशपांडेंनी डिवचलं
वसंत मोरे ऑन फायर! चंद्रकातदादा म्हणाले, “वसंत तुम्ही भाजपात या, मी म्हणालो…”
“माझ्या नादाला लागायचं नाय, असे 100 जण तंगड्याला बांधून फिरते ही चित्रा वाघ”
“सदावर्तेंच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 50 हजार रूपये बक्षीस देणार”
रुपाली चाकणकर यांची चित्रा वाघ यांच्यावर घणाघाती टीका, म्हणाल्या…
Comments are closed.