Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (25 जुलै) मुंबईत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघांचा आढावा घेतला.यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. या दरम्यान, राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी मोठी घोषणा केली आहे.
मनसे या विधानसभा निवडणुकीत 225 ते 250 जागा लढणार आहे. यावेळेला मनसेचे पदाधिकारी काहीही करुन सत्तेत बसवणारच, हे घडणार, असा शब्द राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलाय. ते आज मुंबईत बोलत होते.
मनसे 225 ते 250 जागा लढणार
“मी तुम्हाला खरं सांगतो निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच तिकिट दिलं जाणार आहे. तिकिट मिळालं की मी पैसे काढायला मोकळा असल्या कुणालाही तिकिट दिलं जाणार नाही. तुम्ही जे बोलाल जे सांगाल जे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांना नीट माहिती द्या. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसेचे पदाधिकारी आणि आपले लोक सत्तेत बसावयचे आहेत.”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
पुढे त्यांनी युतीबाबत देखील भाष्य केलं. “युती होणार की नाही?, याचा विचार मनात आणू नका. आपण 225 ते 250 जागा लढणार आहोत.कुणी कितीही मोठ्याने घोषणा दिल्या तरीही तिकिट पक्कं असं समजू नका. कुणी कुठल्याही भ्रमात राहू नका. तसंच मला काही जणांनी सांगितलं की आपला पक्ष काहींना सोडायचा आहे. त्यांना मी रेड कार्पेट घालून देतो, त्यांनी खुशाल पक्ष सोडून जावं.”, असं राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी म्हटलं.
“कोणत्याही परिस्थितीत सत्तेत बसणार”
तसंच 1 ऑगस्ट पासून महाराष्ट्र दौरा करणार असल्याचं देखील यावेळी राज ठाकरे यांनी सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे ते भाजपसोबत युती करणार नसल्याचे त्यांनी संकेत दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, आता विधानसभा निवडणूक त्यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी लाडकी बहीण-भाऊ योजनेवर देखील भाष्य केलं आहे. लाडकी भाऊ आणि बहीण एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते, असा टोला राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Raj Thackeray ) यांना लगावला आहे.
News Title – Raj Thackeray will contest 250 assembly seats
महत्त्वाच्या बातम्या-
पावसाळ्यात लोणावळ्यातील ‘या’ स्पॉटला जाण्याचा मोह आवरा; अन्यथा…
पुण्याला पावसाने धो-धो धुतलं! जनजीवन विस्कळीत, 24 तासातली आकडेवारी धक्कादायक
पुण्यात पावसाचा धिंगाणा, तीन जणांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू
पुण्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती, अजित पवार अॅक्शन मोडवर
पुण्यात पावसाचा हाहाकार! सिंहगड रोडवर धडकी भरवणारी परिस्थिती, अनेक भाग गेले पाण्याखाली