बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी राज ठाकरे अयोध्येला जाणार, कांचन गिरीजींनी घेतली भेट

मुंबई | जगतगुरु सुर्याचार्य आणि कांचन गिरीजी यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’ येथे भेट घेतली आहे. या भेटीमध्ये राज ठाकरे यांनी प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी अयोध्येला येण्याची ईच्छा बोलून दाखवल्याची माहिती कांचन गिरीजींनी दिली आहे.

राज ठाकरेंच्या भेटीनंतर कांचन गिरीजींनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची डिसेंबर महिन्यात अयोध्येत येण्याची ईच्छा आहे. आम्ही त्यांचं स्वागत करु, अशी माहिती कांचन गिरीजी यांना दिली आहे.

तसेच राज ठाकरे यांची हिंदू राष्ट्राबाबतची संकल्पना खूप स्पष्ट आहे. राज ठाकरे यांनी हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठीच्या कार्याला हातभार लावावा, अशी मागणी देखील आम्ही राज ठाकरेंकडे केली आहे, असंही कांचन गिरीजी यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे दिवाळीनंतर अयोध्येला जाण्याची शक्यता आहे. 5 डिसेंबर रोजी राज ठाकरे प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी अयोध्येत दाखल होतील, असं देखील बोललं जात आहे. हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठी राज ठाकरेंचा हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे.

थोडक्यात बातम्या –

आमच्या धर्माचा अपमान होत आहे म्हणत तरूणीला जबरदस्तीने काढायला लावला बुरखा… पाहा व्हिडीओ

“चोरांना आणि त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल”

…अन् क्षणात भलं मोठं घर कोसळलं, पाहा केरळमधील थरारक व्हिडीओ

भाजपला मोठा धक्का; ‘या’ दोन मोठ्या नेत्यांचा पक्षाला रामराम

“पवारांचा एकेरी उल्लेख करणं पाटलांना शोभतं का? कुठे हिमालय, कुठे टेकाड टेंगूळ”

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More