Graduate Election l लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागला आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र आता सर्वांचे लक्ष पदवीधर निवडणुकीकडे लागले आहे. पदवीधर निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली होती. मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर करुन भाजप पक्षाला मोठा धक्का दिला होता.
कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेची माघार :
भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेने अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे कोकण पदवीधरची निवडणूक ही भाजप विरुद्ध मनसे अशी रंगणार अशा चर्चाना उधाण आलं होत. यासंदर्भात भाजपने जोरदार हालचाली करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मनधरणी करण्यासाठी निरंजन डावखरे आणि प्रसाद लाड यांना राज ठाकरेंच्या शिवतिर्थावर पाठवले होते.
अशातच आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र सकाळीच शिवतिर्थावर पोहचलेल्या प्रसाद लाड आणि निरंजन डावखरे यांना राज ठाकरेंची मनधरणी करण्यात यश आले आहे. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कोकण पदवीधर निवडणुकीतून अभिजीत पानसे यांची माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Graduate Election l भाजप मनसेची मनधरणी करण्यात यशस्वी :
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपकजून निरंजन डावखरे रिंगणात उतरले आहेत. निरंजन डावखरे हे मागच्या दोन टर्मपासून कोकण पदवीधर मतदारसंघात आमदार म्हणून कार्यरत आहेत. निरंजन डावखरे यांच्यासाठी मनसेचे अभिजित पानसे यांनी माघार घेतली आहे.
पदवीधर निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून या जागेसाठी रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र महायुतीला मनसेने बिनशर्त पाठिंबा दिल्याने आणि कोकण पदवीधर निवडणुकीसाठी अभिजित पानसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीत मिठाचा खडा पडतोय की काय अशा चर्चा रंगल्या होत्या.
News Title – Raj Thackeray withdraws from Konkan graduate constituency
महत्त्वाच्या बातम्या
राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
अजित पवार गटाचे ‘हे’ 6 आमदार नाराज; घरवापसी करणार? अजित पवार म्हणाले…
या राशीच्या व्यक्तींनी जोडीदाराविषयीचे गैरसमज टाळावेत
“देवेंद्र फडणवीसांमुळेच भाजपचा पराभव झाला”; ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य
अजित पवार म्हणालेले ‘तुला बघतोच’, बजरंग सोनवणे म्हणाले ‘बघा मी निवडून…’