बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत, त्यांच्यासाठी मुंबई लोकल तातडीने सुरु करा- राज ठाकरे

मुंबई | ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांच्यासाठी मुंबई लोकल तातडीने सुरु करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. राज ठाकरे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे.

महाराष्ट्र सरकारनं निर्बंध शिथिल करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुंबईची लोकल सेवा सुरु करण्यासाठी आता तातडीनं पावले उचलावीत. सर्वसामान्य माणसानं आत्तापर्यंत खूप सहन केलं आणि त्याची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहीलच परंतु लोकल प्रवास तातडीनं सुरु करण्यासाठी आंदोलन सुरू करेल, असा इशारा राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.

मुंबईतील जवळजवळ सर्व कार्यालय सुरु आहेत. सर्वाना घरून काम करता येणं शक्य नाही. यासाठी त्यांना रोज अनेक तास प्रवास करावा लागतो आहे. त्यात लोकल सेवा बंद असल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत, असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे.

महाराष्ट्र सरकारनं बस सेवेला परवानगी दिली; पण लोकल बंद असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होत असते. अशा गर्दीत प्रवास केल्यानं रोगही अधिक पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे बस सुरु आणि लोकल बंद यामुळे नेमकं काय साध्य होणार?, असा सवाल राज ठाकरेंनी सरकारला केला आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे आजचा भाव

‘सीटी ऑफ ड्रीम्स 2’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलरनं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला, पाहा व्हिडीओ!

“देवेंद्र फडणवीसांच्या दमदार कामगिरीला महाराष्ट्र विसरला नाही, विसरणार नाही”

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठा झटका; सरकार ‘हा’ निर्णय घेण्याच्या तयारीत

जातीचा उल्लेख केल्यानं ‘मिस्टर आयपीएल’ वादाच्या भोवऱ्यात!

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More