बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हे राज्याला परवडणार नाही’; राज ठाकरेंचं उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीसांना पत्रं

मुंबई | नाणार प्रकल्पावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. नाणार प्रकल्प गमावणं राज्याला परवडणारं नाही, असं राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे.

राज्याचं अर्थचक्र गतीमान करायचं असेल तर नाणार प्रकल्पाबाबत सामंजस्याने भूमिका घ्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. राज ठाकरेंनी यासंदर्भात काही ट्विट देखील केले आहेत. कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातातून गमावणं ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला, असं राज ठाकरे म्हणालेत.

कोकण जितका निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे तितकाच सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध आहे आणि नरोत्तमांची खाण आहे. मी माझ्या भाषणात अनेकवेळा ह्याचा उल्लेख केला आहे की ‘कोकण किनारपट्टी’ असा जर भौगोलिक परिसर बघितला तर ह्या भूमीने 7 भारतरत्नं दिली आहेत. त्यातील 4 तर फक्त एकट्या दापोलीमधील आहेत. पण इतकं असून देखील कोकणी तरुण विषण्ण मनस्थितीत आहे. त्याला नोकरीसाठी, रोजगारासाठी मुंबई-पुण्याची वाट धरावी लागते. खरं तर पर्यटन कोकणाचं भवितव्य बदलू शकतं पण तो विचार नीट झाला नाही. एखादा मोठा प्रकल्प येईल, त्याने भविष्य बदलेल असे आशेचे किरण दिसले खरे पण ते प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकले नाहीत. अशीच एक संधी पुन्हा एकदा चालून आली आहे, असं राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे.

राज्यात, देशात गुंतवणूक यावी ह्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरु आहे. मध्यंतरी एक मोठा आंतरराष्ट्रीय प्रकल्प बेंगळुरूत गेला आणि तो महाराष्ट्रात परत यावा ह्यासाठी महाराष्ट्र सरकारची धडपड सुरु आहे हे मी वाचलं. ही बातमी क्लेशदायक होती. आसपासची राज्यं महाराष्ट्राच्या घशात हात घालून उद्योग पळवून न्यायला टपलेली आहेत. अशा वेळेस महाराष्ट्राने ‘रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा प्रकल्प हातातून गमावू नये, असं मत राज ठाकरेंनी मांडलं आहे.

 

 

 

 

 

 

थोडक्यात बातम्या-

“सध्या देशाची परिस्थिती आणीबाणी बरी होती असं म्हणावं अशीच आहे”.

न्यूयॉर्कमध्ये प्रियंका चोप्राने सुुरू केलं भारतीय रेस्टॉरंट; पूजेचे फोटो केले शेअर3.

गोपीचंद पडळकरांनी आता थेट उद्धव ठाकरेंना दिलं आव्हान, म्हणाले…

अबब…यंदा हापुस आंब्याच्या किमतीने मोडला 100 वर्षांचा रेकाॅर्ड

जिद्दीला सलाम! वडिलांचा मृतदेह समोर असताना मंगलने दिली CA ची परीक्षा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More