औरंगाबाद | मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या 1 मे रोजी औरंगाबादमध्ये (Aurangabad) होणाऱ्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेची जोरदार तयारी सुरू झाली असून या सभेला अद्यापही औरंगाबाद पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच औरंगाबादेत 9 मे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेचं काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, काही अटी-शर्तींसह राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आह.
1 मे रोजी महाराष्ट्र दिन असल्याने धर्म, प्रांत, वंश, जात यावरून वक्तव्य करू नये. सभेच्या ठिकाणी असभ्य वक्तव्य करू नये. व्यक्ती किंवा सामुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा काही महत्त्वाच्या अटींसह राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सभेच्या आधी किंवा नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढायला तसेच सामाजिक वातावरण बिघडेल अशी घोषणाबाजी करायला देखील मनाई असेल. राज ठाकरेंच्या सभेला अजूनही अधिकृतपणे परवानगी देण्यात आली नसली तरी या काही अटींसह राज ठाकरेंची सभा होऊ शकते.
थोडक्यात बातम्या-
राज्यात कोरोनाचे नवे variant आढळल्यानंतर राजेश टोपेंनी दिली ‘ही’ अत्यंत महत्त्वाची माहिती
रशियाच्या इशाऱ्याला अमेरिकेकडून केराची टोपली, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत
“आज्जींना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ आहे, पण आमच्यासाठी नाही”
राज ठाकरेंच्या सभेला अद्याप परवानगी नाही, बाळा नांदगावकर म्हणतात…
Comments are closed.