नागपूर महाराष्ट्र

राज ठाकरेंची व्यंगचित्र सभांपेक्षा परिणामकारक; छगन भुजबळांची स्तुतीसुमनं

नागपूर | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेली व्यंगचित्र अनेक सभांपेक्षा परिणामकारक असतात, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंचं कौतुक केलं आहे. ते गुरुवारी नागपूरमध्ये बोलत होतो. 

मनसे आघाडीत राहील पण निवडणुकीच्या मैदानात नाही. निवडणूक न लढवताही काही जण आघाडीत राहू शकतात, असंही ते म्हणाले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राज ठाकरे तीव्र शब्दात प्रहार करतात. त्यांची व्यंगचित्रे टोकदार असतात. सभांमधून परिणाम होत नाही इतका प्रभाव त्यांच्या व्यंगचित्रातून होतो, अशीही स्तुतीसुमनं छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंवर उधळली.

दरम्यान, ‘पहले मंदिर फिर सरकार’ या मतावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कायम राहावं, असा सल्लाही त्यांना यावेळी दिला.

महत्वाच्या बातम्या-

“गडकरींच्या मनात तसेे काही असते तर ते मला बोलले असते”

मुलाच्या लग्नानंतर आता राज ठाकरे लावणार 500 आदिवासी जोडप्यांचं लग्न!

-‘नरेंद्र मोदी मुर्दाबाद’ घोषणा देऊ नका; राहुल गांधींच्या सूचना

‘भाजप नेते’ हल्ला करतील या भीतीने पत्रकारांनी डोक्यात घातलंय हेल्मेट!

नरेंद्र मोदींना स्टेजवर माझ्यासमोर 5 मिनिटं उभं करा; राहुल गांधींचं भाजपला आव्हान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या