पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडीपाडवा मेळाव्यात बोलताना मशिदीवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतली. राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादीने (NCP) राज ठाकरेंवर सडकून टीका केली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी पुण्यात पत्रकार परिषद घेत गंभीर इशारा दिला आहे.
‘तुमचे भोंगे काढा अन्यथा आम्ही हनुमान चालिसा लावू’ या राज ठाकरेंच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर हनुमान जयंती निमित्तच्या महाआरतीला पुण्यात तुफान गर्दी झाली. भगवी शाल पांघरूण महाआरती केल्यानंतर राज ठाकरेंनी 1 मे रोजी औरंगाबादेत जाहीर सभा घेणार असून 5 जून रोजी आयोध्या दौरा करणार असल्याचं जाहीर केलं.
आमच्या मिरवणुकांवर कोणी दगडफेक केली तरी आम्ही शांत बसणार नाहीत. आमचे हात बांधलेले नाहीत, अशा शब्दात राज ठाकरेंनी गंभीर इशारा दिला आहे. आमचे हात बांधले नसून जशास तसे उत्तर देऊ, असं म्हणत राज ठाकरेंनी शोभायांत्रेंवरील दगडफेकीसंदर्भात इशारा दिला आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी पुण्यातील खालकर चौक मारूती मंदिरात शनिवारी संध्याकाळी मारूतीची महाआरती केली. मारूतीची साग्रसंगीत पूजा आणि महाआरती झाल्यानंतर मंदिराच्या आवारातील सालसर मंडळाने हनुमान चालिसाचे पठण सुरू केले.
थोडक्यात बातम्या-
“अरं…मला बी तमाशाला बोलवा”, अजितदादांच्या वक्तव्याने एकच हशा पिकला
…अन् हलगीच्या तालावर अमोल कोल्हेंनी धरला ठेका; व्हिडीओ तुफान व्हायरल
“आयत्या बिळात नागोबा”, प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंना खोचक टोला
“राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे बनायचंय म्हणून…”
“…तर आम्ही इथवर पोहोचलोच नसतो”; ज्येष्ठ दिग्दर्शकाची भावूक पोस्ट
Comments are closed.