बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Vasant More | अन् राजसाहेब मला म्हणाले,”तू काही स्ट्रेसमध्ये आहेस का?”

पुणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांचा महाराष्ट्र दौरा 15 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने कंबर कसली आहे. त्यातच पुण्यातील मनसेचे प्रमुख चेहरा म्हणून नगरसेवक वसंत मोरे ( Vasant More ) यांच्याकडे पाहिल जातं. वसंत मोरे यांनी ट्विट करत राज ठाकरे यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. (Vasant More expressed his feelings about Raj Thackeray)

‘साहेब, माझे 2006 ला वडिल गेले आणि अवघ्या पाच महिन्यानंतर मी नगरसेवक झालो. तेव्हापासून कोणीच मला विचारले नाही ते तुम्ही मला विचारले’,असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना त्यांच्या मानसिकतेबाबत विचारणा केली. याबाबचे ट्विट वसंत मोरे यांनी केलं आहे. वसंत, मी गेल्या अनेक मिटींगमध्ये पाहतोय तू बोलत नाहीस, तू काहीतरी स्ट्रेसमध्ये आहेस, अशी विचारणा राज ठाकरे यांनी केल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं आहे.

तसेच यावेळी वसंत मोरे यांनी आणि मला तिकडेच वाटले की, माझ्या जीवनात अजूनही एक व्यक्ती आहे. जी माझ्या चेहऱ्यावरील तणाव ओळखू शकते. मी त्यामुळे थोडा भावनिक झालो होतो, अशा शब्दांमध्ये वसंत मोरे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मला नेहमी वाटते की, माझा पक्ष हा पुण्यात एक नंबरला असावा, असंही वसंत मोरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, पुण्यातील एक कर्तव्यदक्ष नगरसेवक अशी वसंत मोरे यांची ओळख आहे. कोरोनाकाळात रूग्णवाहिका मिळत नसल्याने अधिकाऱ्यांना सुनावल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसेच पुण्यात प्रत्येक वार्डात मनसेच्या शाखा आणि नव्याने शाखाअध्यक्ष नियुक्त केले जात आहेत. आगामी पुणे महानगरपालिकेत मनसेचा नगरसेवकांचा संख्याबळ किती वाढते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

पाहा पोस्ट-


थोडक्यात बातम्या-

“एकीकडे RSS समान नागरी कायद्यासाठी आग्रही, तर भाजप…”

“आम्हाला वाटत होते की बाळासाहेब ठाकरे हे संजय राऊतांचे गुरु, पण खरे गुरु शरद पवारच”

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे 2 वर्षासाठी तडीपार

“छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा समावेश राज्य शासनानं थोर महापुरुषांच्या यादीत करावा”

omicron मुळे मृत्यूचा धोका किती?; दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More