बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज ठाकरेंना मोठा धक्का; अतिप्रिय असलेला जेम्स काळाच्या पडद्याआड

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अत्यंत जवळचा असणारा ग्रेट डेन जातीचा कुत्रा जेम्स काळाच्या पडद्याआड गेल्याचं वृत समोर आलं आहे. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे यांच्याबरोबर जेम्स नावाचा ग्रेट डेन प्रजातीचा कुत्रा होता. अखेर वयोमानाने काल रात्री जेम्सचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

राज ठाकरे यांचा अतिप्रिय असलेल्या कुत्र्याच्या निधनाने त्यांना चांगलाच धक्का बसल्याचं बोललं जात आहे. राज ठाकरेंकडे ग्रेट डेन या जातीचे तीन कुत्रे होते. त्यापैकी बॉंंड आणि शाॅन यांचं यापुर्वीच निधन झालं होतं.

तीन ग्रेट डेनपैकी राहिलेला एक जेम्स हा देखील काल काळाच्या पडद्याआड गेल्याने राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राज ठाकरे यांच्या घरातील व्यक्ती व ते स्वत: कुत्र्यांवर घरातील व्यक्ती प्रमाणेच प्रेम करत होते व त्यांना कुत्र्यांबद्दल खूप प्रेम देखील आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून जेम्स हा राज ठाकरे यांच्याबरोबर होता. त्यामुळे त्याच्याबद्दल विशेष प्रेम आणि कळवळा राज ठाकरे यांना होता, तसेच वयोमानानुसार जेम्सचं काल रात्री बारा वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झालं आहे.

थोडक्यात बातम्या –

देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत 99 दिवसातील निच्चांकी, रूग्णसंख्येत 11 हजारांची घट

पुणे महापालिकेच्या प्रश्नांसाठी अजित पवारांची मंत्रालयात बैठक, पण महापौरांना मात्र निमंत्रणच नाही!

चक्क हवाई बेटांसारखी तीन दिवस रंगणार होती इगतपुरी रेव्ह पार्टी

“ईडीला सर्व पुरावे मिळाले, अनिल देशमुखांना लवकरच अटक होईल”

‘सुप्रिया ताईंचा ईडीवर पक्का विश्वास आहे’; भाजपची सुप्रिया सुळेंवर खोचक टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More