बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठी पाट्यांवरील निर्णयावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | राज्यातील दुकानांच्या पाट्या मराठीत मोठ्या अक्षरात असाव्यात या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे या निर्णयामुळे राज्यातील सर्व छोट्या-मोठ्या दुकानावरील पाट्या मराठी भाषेतून ठेवाव्या लागणार आहेत.

बुधवारी मंत्रीमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनयमन) अधिनियम, 2017 यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे पडसाद आता राज्यभरात पहायला मिळत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ह्या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये. परंतु 2008, 2009 साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

पुढे ते म्हणाले की, काल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं दुकानावरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेव्हा त्याचं श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांचं मन:पूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच.

 

 थोडक्यात बातम्या – 

भाजपमध्ये नक्की चाललंय काय?; आता सातव्या आमदाराचा पक्षाला रामराम

सेक्स करताना अतिउत्साह नडला; तरूणाला गाठावं लागलं थेट रूग्णालय

Gold-Silver Price: वाचा सोने-चांदीचा आजचा ताजा भाव

‘या’ लोकांसाठी Omicron घातक, WHo नं दिला गंभीर इशारा

पेट्रोल- डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या किंमत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More