मंबई | मनसेनं ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलं यश मिळवलं आहे. राज्यातील बऱ्यापैकी ग्रामपंचायती मनसेनं ताब्यात घेतल्या आहेत. यावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत, त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन, असं राज ठाकरेंनी म्हटलंय. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.
तुमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे, त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा. बाकी तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या, असं राज ठाकरेंनी म्हटलंय.
दरम्यान, राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका ताकदीनं लढवा, असे आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले होते.
ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. तुमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा. बाकी तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या.
— Raj Thackeray (@RajThackeray) January 20, 2021
थोडक्यात बातम्या-
‘शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ आहे’; ‘या’ भाजप नेत्याची बोचरी टीका
भाजपने निलेश राणेंवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी
ठाकरे सरकार कधी पडेल हे मी आता सांगणार नाही, कारण…- नारायण राणे
“धनंजय मुंडे यांचा जीव शरद पवार नावाच्या पोपटात अडकला आहे”
“कुठल्या तरी कंपनीत ड्रायव्हर म्हणून जायचं, हे चुकून इकडं आलेत”