मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादमधील राज गर्जनेनं सध्या राज्यातील वातावरण जोरदार पेटलेलं आहे. भोंग्याच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंनी दिलेला अल्टिमेटम सरकार पाळणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
राज ठाकरेंच्या सभेनंतर त्यांनी एक ट्विट केलं आहे. हे ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षय्य तृतीया आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करु नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही, अशा आशयांचं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं; हे मी उद्या माझ्या ट्विटरद्वारे आपल्यासमोर मांडेन.
दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेनं मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मात्र 4 तारखेपर्यंत राज ठाकरेंनी त्यांना शांत राहण्यास सांगितलं आहे. 4 तारखेनंतर एकलं नाही तर तमाम हिंदू बांधवांनी दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा, असा सूचक इशारा राज यांनी दिला आहे.
महाराष्ट्र सैनिकांसाठी… pic.twitter.com/zNxanlUVpg
— Raj Thackeray (@RajThackeray) May 2, 2022
थोडक्यात बातम्या –
लसीकरणाविषयी सुप्रीम कोर्टानं दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
‘महाराष्ट्रात हुकुमशाही चालणार नाही’; अजित पवारांचा गंभीर इशारा
मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर अमृता फडणवीसांचा पलटवार, म्हणाल्या…
राज ठाकरेंवर कारवाई होणार?, गृहमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती
वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना इशारा जारी
Comments are closed.