‘एकनाथ शिंदेजी अभिनंदन, पण…’; शुभेच्छा देत राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा
मुंबई | एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून गुरुवारी (30 जून 2022) शपथ घेतली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.या सर्व घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे यांची प्रतिक्रिया आता आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून राज यांनी एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देत एक इशारा दिला आहे.
एकनाथ शिंदेजी, आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपले अभिनंदन. खरंच मनापासून आनंद झाला. नशिबाने आपल्याला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. आता ती स्वकर्तृत्वाने सिद्ध कराल ही आशा. आपण तरी बेसावघ राहू नका. सावधपणे पावले टाका. पुन्हा एकदा आपले अभिनंदन, असं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.
राज यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय. एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तुत्व समजू लागतो त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर दिलीये.
थोडक्यात बातम्या-
“सत्ता समोर आल्यानंतर मोह सोडायला संघाचे संस्कार आणि देवेंद्र फडणवीसांचे काळीज लागतं”
फडणवीसांची मोठी खेळी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सरकारचं रिमोट देवेंद्र फडणवीसांकडे?
देवेंद्र फडणवीसांसारखी माणसं राजकारणात दुर्मिळ, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला- एकनाथ शिंदे
पुन्हा एकदा शिवसेनेचाच मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार
Comments are closed.