राज ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव, पत्र लिहित म्हणाले…
मुंबई | 10 दिवसाच्या राजकीय नाट्यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. तर देंवेद्र फडणवीस आता उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळतील. शिंदेगटाच्या बंडखोरी दरम्यान मनसे आणि राज ठाकरे शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा होती. मात्र तसं काही घडलं नाही. दरम्यान आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देंवेद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्राची सध्या चर्चा आहे.
प्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालात त्याबद्दल तुमचे खूप अभिनंदन. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून परताल असं वाटल होत, परंतू तसं घडलं नाही असो…, अशा शब्दात राज ठाकरे यांनी पत्राची सुरूवात केली आहे.
तुम्ही पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. हे सरकार आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले हे सर्वांना ज्ञात आहे. पक्षादेश सांभाळत, मनातील हुदंका आवरत उपमुख्यमंत्रीपद स्विकारलं. पक्षाशी बांधिलकी म्हणजे काय हा वस्तुपाठ कार्यकर्त्यांनी ,राजकारण्यांनी लक्षात ठेवण्यासारखा आहे, असंही राज ठाकरेंनी पत्रात नमूद केलं आहे.
दरम्यान, ही बढोत्री की अवनती हे आता मी नमूद करणार नाही. धनुष्यबाणातून भविष्याचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते पण त्याला कोणी माघार म्हणत नाही. देशाच्या भल्यासाठी काम करण्यास संधी मिळो ही सदिच्छा, असं देखील राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.
श्री. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन! pic.twitter.com/2TokAB3E1F
— Raj Thackeray (@RajThackeray) July 1, 2022
थोडक्यात बातम्या
नीरज चोप्राचा आणखी एक पराक्रम, रौप्य पदकावरही कोरलं नाव
मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदेंनी केला ‘हा’ नवा संकल्प
‘काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल…’, शिंदे सरकारमध्ये शहाजी पाटलांना मंत्रीपद मिळणार ?
‘हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही’; उद्धव ठाकरे अखेर स्पष्टच बोलले
Comments are closed.