मोठी बातमी! राज ठाकरेंची पुण्यातील सभा रद्द, ‘हे’ मोठं कारण आलं समोर
पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं. तसेच राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळावा, उत्तर सभा आणि औरंगाबादमधील जाहीर सभेत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) फैलावर घेतलं.
राज ठाकरे 5 जूूनरोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असून ते तत्पूर्वी पुण्यात (Pune) जाहीर सभा घेणार होते. आधीच्या तीन सभांनंतर संपूर्ण राज्याचं लक्ष या सभेकडे लागलं असताना राज ठाकरेंची पुण्यातील सभा रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे.
येत्या 21 मे रोजी राज ठाकरे पुण्यात सभा घेणार होते. मात्र, पावसाच्या शक्यतेमुळे राज ठाकरेंची पुण्यातील सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन दिवसांत पुण्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यात सध्या अनेक मुद्दे गाजत असताना आता पुण्यातील सभेत राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, पावसाचं कारण देत राज ठाकरेंची पुण्यातील जाहीर सभा रद्द करण्यात आली आहे.
थोडक्यात बातम्या-
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस वाढली, संजय राऊतांच्या वक्तव्याने खळबळ
केतकी चितळे प्रकरणाला नवं वळण, ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर
‘आम्ही चवन्नी छाप, भाडोत्री लोक ठेवणार नाही तर…’; नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य
किरीट सोमय्यांचा संजय राऊतांना दणका, उचललं ‘हे’ मोठं पाऊल
“राजे… डाव ओळखा, हे पवार मराठ्यांचे कधीच झाले नाहीत”
Comments are closed.