पुणे | येत्या फेब्रुवारीत काही महानगरपालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक, पुणे, ठाणे आणि मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. नुकताच त्यांनी पुण्याचा दौरा केला होता. त्यात त्यांनी पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या गाठीभेठी घेतल्या आणि येत्या निवडणुकीच्या पाश्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच आता राज ठाकरे पुन्हा पुण्यात आले आहेत.
मागील महिन्यात राज ठाकरे यांनी तीन वेळा पुण्याचा दौरा केला. त्यातच आता चौथ्यांदा पुन्हा राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. मनसे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी याबाबतची माहिती माध्यमांना दिली आहे. मागील महिन्यात 19, 20 आणि 21 असे तीन दिवस राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी प्रत्येक पदाधिकऱ्यांची भेट घेतली होती.
आज बाबासाहेब पुरंदरे तिथीप्रमाणे 100 व्या वर्षात प्रदार्पण करत आहेत. या निमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर सुमित्रा महाजन देखील उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर उद्या ते आढावा बैठक घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सध्या पुणे महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. मनसेचा पुणे महापालिकेवर डोळा आहे. 90 जागांपैकी 45 जागा निवडूण येणारचं असं मनसे नेत्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यामुळे या निवडणुकीला एक वेगळंच महत्व प्राप्त झालं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘राहुल गांधींना लोकसभेतून निलंबित करा’; रामदास आठवलेंची मोठी मागणी
पुण्यातील मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठे यांना अटक; धक्कादायक कारण आलं समोर
‘आमदाराच्या मुलीला थार गाडी द्या’; सनी देओलचं थेट आनंद महिंद्रांना पत्र
भागवत कराडांपेक्षा माझी उंची खूप मोठी, त्यांची माझ्याशी तुलनाच होऊ शकत नाही- चंद्रकांत खैरे
कोरोनाची ‘ही’ लस ठरतेय धोकादायक; अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर
Comments are closed.