बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज ठाकरेंचा मराठी कलाकारांशी ऑनलाईन संवाद; समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं दिलं आश्वासन

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असतानाच सिनेसृष्टीवरही त्याचा मोठा परिणाम होत असताना पाहायला मिळत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन घोषित केला आहे.

महाराष्ट्रातील लॉकडाऊन दरम्यान, मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांना तसेच सिनेसृष्टीशी निगडीत असलेल्या इतर व्यक्तींना शूटिंग बंद असल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी सिनेसृष्टीत काम करणाऱ्या विविध मान्यवरांशी ऑनलाईन संवाद साधला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्यासमवेत मराठी सिनेसृष्टीतील 50 हून अधिक कलाकारांशी राज ठाकरे यांनी ऑनलाईन संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. राज्यभरात शूटिंग पुन्हा सुरू व्हावं, लोककलावंतांसाठी विशेष पॅकेज जाहीर व्हावं, बॅकस्टेज काम करणाऱ्या लोकांना अनुदान मिळावं तसेच लसीकरणासाठीही विशेष व्यवस्था करण्यात यावी, अशा विविध मागण्या यावेळी या संवादात उपस्थित करण्यात आल्या.

कलाकारांनी तसेच सिनेसृष्टीतील मान्यवरांनी केलेल्या या मागण्या राज ठाकरे यांनी नोंदवून घेतल्या असून या मागण्यांविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून या गोष्टींचा पाठपुरावा करू, असं आश्वासन या संवादावेळी राज ठाकरे यांनी दिलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

सलग सातव्या दिवशी देशातील बरे होणाऱ्यांची संख्या अधिक; कोरोनामुक्त होणाऱ्यांची टक्केवारी वाढली

प्रसिद्ध गायक अरिजीत सिंहच्या आईचं कोरोनाने निधन

15 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला नकाशाची काय गरज?, मोदींवर टीका; राष्ट्रवादीनं दाखवला पवारांचा व्हिडीओ

‘…तेव्हा साहेबांच्या खिशातल्या पेनाची शाई संपली होती का?’; राम सातपुतेंची रोहित पवारांवर टीका

दोन कोटी लसी जमिनीतून उगवल्या का?- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More