Raj Thackeray: “सकाळी पाहतो काय, तर जोडा वेगळाच”; पहाटेच्या शपथविधीवरून राज ठाकरेंचा टोला
मुंबई | अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या मनसेच्या दसरा मेळाव्याला आता सुरूवात झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंचा (Raj Thackeray) आवाज दोन वर्षांनी शिवाजी पार्क मैदानावर घुमतो आहे. राज ठाकरेंनी सुरूवातीपासूनच महाविकास आघाडीवर टोले लगावायला सुरूवात केली आहे.
राज्याच्या राजकारणात आपली वेगळी ओळख असणाऱ्या सकाळच्या शपथविधीवरून राज ठाकरेंनी भाजप, महाविकास आघाडीला टोले लगावले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबरदस्त टीका केली आहे. परिणामी राज ठाकरेंच्या भाषणाची चर्चा होत आहे.
एकदा सकाळी उठतो काय, पहातो काय, जोडा वेगळाच, साला पळून कोणाबरोबर गेली, लग्न कोणा बरोबर केलं हेच समजेना, असा खोचक टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.
जातीच्या हत्याराच्या जोरावर काम होत नाहीत, असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला आहे. माझ्या दृष्टीकोणातील हिंदूत्व मी मांडणार आहे, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या –
“बाप तो बाप असतो आणि नेता तो नेता, हे कोणी विसरता कामा नये”
Dhananjay Munde: त्यादिवशी विधानसभेत नक्की काय झालं?; अखेर धनंजय मुंडेंनी खुलासा केला
“अजितदादा तुम्ही जिथं आहात, तिथं मी यायची गरज नाही, आपण एकत्रच…”
Weather Alert: राज्यातील ‘या’ भागात जोरदार पाऊस कोसळणार; उकाड्यापासून सुटका
Comments are closed.