बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राज ठाकरेंचं समर्थन भाजपला महागात पडेल’; केंद्रीय मंत्र्याचा भाजपला सल्ला

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवर भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. माझा कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेस विरोध नाही. मात्र, मशिदीवरील भोंगे हटवले गेले पाहिजेत, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. राज ठाकरेंनी हिंदूत्ववादी भूमिका घेतल्याने मनसे भाजप युती होणार का?, अशा चर्चांना उधाण आले आहे.

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी भाजपला सल्ला दिला आहे. मशिदीवरील भोंगे हटवणे असंवैधानिक असून राज ठाकरेंना समर्थन देणे भाजपला राजकीय पातळीवर महागात पडेल, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.  आपला रिपाई पक्ष राज ठाकरेंचं समर्थन करत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांना आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मंदिरात भोंगे लावा. मात्र, मशिदीवरील भोंगे हटवणे हे बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच्या विरूद्ध आहे, असं म्हणत रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना तीव्र विरोध दर्शविला आहे.

दरम्यान, संविधानाने सर्वांना सर्वधर्म समभावाचा नारा दिला आहे. जर राज ठाकरेंनी संविधान विरोधी वक्तव्ये करत दादागिरी केली तर रिपाई आपल्या पद्धतीने उत्तर देईल, असा इशारा रामदास आठवलेंनी दिला आहे. मनसेची भूमिका ही अतिघाईची असून हार्ड भूमिका घेऊन भाजपला फायदा होणार नाही, असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

मुख्यमंत्री राज्यपालांकडे नवी यादी पाठवणार; ‘या’ नेत्यांची नावे वगळली

…अन् भर मंडपात नवरीने नवऱ्याच्या कानशिलात लगावली; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

ऐन उन्हाळ्यात लिंबाचे भाव गगनाला का भिडले?, वाचा सविस्तर

भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले “सीतेचं अपहरण करून रावणाने…”

पुढील दोन दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More