बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज ठाकरेंना धमकीचा फोन, केंद्र सरकार उचलणार ‘हे’ मोठं पाऊल

मुंबई | गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केलेल्या वादळी भाषणानं राजकीय वर्तुळातील वातावरण पेटवून टाकलं. मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्यावरून तर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पहायला मिळाल्या. अशातच आता राज ठाकरेंना भोंग्याच्या मुद्यावरुन केलेल्या वक्तव्यामुळे पीएफआयनं धमकी दिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंबंधी 3 मेपर्यंत अल्टिमेटम दिल्यानंतर आता त्याविरोधात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय या संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या धमकीचे फोन पाहता राज ठाकरे यांना Z+ दर्जाची सुरक्षा द्यावी, अशी मागणी आता मनसेकडून केली जात आहे.

राज ठाकरे यांनी मशिदींवर असणाऱ्या भोंग्यावरुन बोलल्यापासून त्यांना धमकीचे फोन येत आहेत, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, राज ठाकरे 5 जूनपासून अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकार सुरक्षा देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

महाविकास आघाडीतील धुसफुस पुन्हा चव्हाट्यावर, राजेश टोपे ‘या’ कारणामुळे नाराज

मोठी बातमी! नवाब मलिकांना न्यायालयाचा मोठा झटका

राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत राज्य सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंना इशारा, म्हणाल्या…

महाराष्ट्रासाठी पुढचे दोन दिवस महत्त्वाचे, ‘या’ भागात पाऊस कोसळणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More