मुंबई | भोंग्याचा वाद काही संपता संपायचं नाव घेईना. अद्यापही भोंग्याच्या मुद्द्यावरुन राज्यात गदारोळ सुरुच आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यावरुन घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांना अनेक टीकांचा सामना करावा लागला. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
गेली 15 वर्षे ज्यांना भोंग्याचा त्रास झाला नाही त्यांना आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच त्रास सुरू झाला, हा पोटदुखीतून सुरू झालेला त्रास आहे, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
तुम्ही भोंग्यांचं राजकारण सुरु केले, जिवंतपणी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्यांनी बाळासाहेबांना जिंवतपणी यातना दिल्या ते आम्हाला बाळासाहेब सांगताहेत?, असं टीकास्त्रही संजय राऊत यांनी सोडलं आहे.
दरम्यान, राज ठाकरेंनी भोंग्याचा मुद्दा उपस्थित केल्यापासून राज्यभरातील वातावरण ढवळून निघालेलं पहायला मिळालं. केवळ महाराष्ट्रच नाहीतर देशातही याचे पडसाद उमटलेले पहायला मिळाले. अद्यापही यावरुन राडा सुरुच आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणारआहे.
थोडक्यात बातम्या –
कुख्यात गुंड आप्पा लोंढे खून प्रकरणी मोठी अपडेट समोर!
रवी राणांना पाहताच नवनीत राणांना अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ
कॅच पकडताना रविंद्र जडेजाला मोठी दुखापत, पाहा व्हिडिओ
“भीमा कोरेगाव हिंसाचाराला फडणवीस सरकार जबाबदार”
“जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत, तोपर्यंत….”; भाजप खासदाराचा गंभीर इशारा
Comments are closed.