पैशांची कामे पूर्ण होताच राजीनामे खिशात ठेवले जातात; राज ठाकरेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

यवतमाळ | भूमिका नेहमी नाटकी राहिली आहे. सतत राजीनामा देण्याची धमकी दिली जाते. पण, पैशांची कामे पूर्ण होताच राजीनामे खिशात ठेवले जातात, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ते यवतमाळमध्ये मनसे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर राज ठाकरे पश्चिम विदार्भाच्या दौऱ्यावर आहे. त्यांनी या भागाची पाहणी केली. तेव्हा भाजप शिवसेनेवर जोरदार टीका केली.

दरम्यान, पूर्वी आम्ही काँग्रेसला शिव्या देत होतो. भाजप- शिवसेनाही त्यातलेच निघाले, असा आरोपही त्यांनी केला. तसंच यवतमाळ जिल्ह्यात येत असताना भीषण परिस्थितीची जाणीव झाली. या प्रश्नाकडे लक्ष देण्यापेक्षा राम मंदिराला प्राधान्य देण्यात आले, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-दारूच्या दुकानासाठी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आमने-सामने

-शिवेंद्रराजे आणि उदयनराजे दोघानांही मी सांगून दमलो!

-अनु मलिक मला घरी बोलवायचे; अाणखी एका गायिकेचा गौप्यस्फोट

-दिवाळीत फटाके फोडण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी; मात्र या वेळेतच फोडण्याची अट

-कर्मचाऱ्यांकडूनच ‘पेटीएम’चा डेटा चोरी; कंपनीकडे 20 कोटींची मागणी

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या