दुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार!

मुंबई | दुष्काळग्रस्तांसाठी मनसे आक्रमक झाली आहे. सरकारला जागं करण्यासाठी मनसे 27 नोव्हेंबरपासून औरंगाबादमध्ये दंडुका मोर्चा काढणार आहे.

सरकारने राज्यातल्या 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे, मात्र सरकारकडून दुष्काळग्रस्तांसाठी कोणत्याच उपाययोजना केल्या जात नाहीत, त्यामुळे दंडुका मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती मनसे नेते अनिल शिदोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

विरोधीपक्ष अाणि मनसेच्या दबावामुळे सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला मात्र सरकारने काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे मनसे दंडुका घेऊन रस्त्यावर उतरणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, या मोर्चात मनसेप्रमुख राज ठाकरे उपस्थित नसतील मात्र शेतकरी दंडुके घेऊन येतील, अन त्याचा सरकारवर कसा वापर करायचा हे शिकवू, असंही त्यांनी सांगितलं. 

महत्त्वाच्या बातम्या-

-तृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी

-दिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा

-मोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार!

-कुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू

-उद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत!