Top News

कोहिनूर प्रकरणी राज ठाकरेंना ईडीची नोटीस; चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश!

Loading...

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ‘कोहिनूर स्केवर’ प्रकरणी ईडीने नोटीस बजावली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंची चौकशी होणार आहे. 22 तारखेला राज ठाकरेंना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज ठाकरे ईडीच्या रडारवर असून त्यांना समन्स बजावण्यात आल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं. मात्र राज ठाकरेंनी आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचं सांगितलं होतं.

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना सरकारविरोधात राज ठाकरेंनी टीका करू नये म्हणून राज ठाकरेंवर दबाव आणण्यासाठी ही कारवाई करण्यातं आल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आल्याचं जराही आश्चर्य वाटत नाही. सरकार सूडाचे राजकारण करत असून हा दबाव तंत्राचा भाग आहे. आम्ही अशा दबावतंत्राला मुळीच भीक घालत नाही, असं मनसे नेते संदिप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-अरूण जेटलींची प्रकृती चिंताजनक; महत्वाचे नेते एम्समध्ये

-उद्यापासून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचा पूरग्रस्त भागाचा दौरा!

-गोपीचंद पडळकर ‘या’ मतदारसंघातून विधानसभा लढणार???

-समाजसुधारक म्हणून पंतप्रधान मोदी ओळखले जातील- अमित शहा

-पंडित नेहरूंमुळेच गोवा मुक्तीस उशीर झाला; भाजपच्या शिवराज सिंह चौहान यांची टीका

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या