Top News

अखेर राज ठाकरेंनी मौन सोडलं; EDच्या नोटीसवर म्हणतात…

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणी ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे. राज ठाकरेंना येत्या 22 तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

मनसेची स्थापना झाल्यापासून माझ्यावर अनेक केसेसे झाल्या आहेत आणि प्रत्येक वेळेस मी तपास यंत्रणांचा आणि न्यायालयाचा आदर केला आहे. यामुळे इडी नोटीसचा देखील आपण आदर करू, असं राज ठाकरे म्हणाले आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट करत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.

माझी तुम्हाला विनंती आहे की 22 ऑगस्टला शांतता राखा. जनतेला त्रास होणार नाही. याची काळजी घ्या. तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला जाईल पण तुम्ही शांत रहा, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, या प्रकरणावर मला जे बोलायचं आहे. ते मी योग्य वेळ आल्यावर बोलेन, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-प्रियांका गांधींचा भाजप आणि संघावर जोरदार हल्लाबोल; म्हणतात…

-काँग्रेसला धक्का; निर्मला गावित यांचा आमदारकीचा राजीनामा

-बायको लाडूशिवाय दुसरं काही खाऊच देत नाही; पतीची घटस्फोटासाठी न्यायालयात धाव

-राष्ट्रवादीत जाणार का??? नारायण राणेंचं 4 शब्दांचं उत्तर अन् पवार वेटिंगवर…!

-वडिल 52 वर्षे काँग्रेस खासदार, मुलगी शिवबंधनात तर मुलगा भाजप वाटेवर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या