मुंबई | कोचिंग क्लासेस सुरु करण्यात यावेत अशी मागणी केली जातेय. त्याचसोबत अकरावीची प्रवेश प्रक्रिया देखील रखडलीये. याचसाठी कोचिंग क्लासेसचं शिष्टमंडळ आणि पालक संघ यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी थेट शिक्षणमंत्र्यांना फोन लावला.
राज ठाकरे यांनी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांच्या मागण्या ऐकून घेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना फोन लावला. दरम्यान वर्षा गायकवाड यांनी संध्याकाळी यासंदर्भात बैठक असल्याचं सांगितलं.
अकरावीच्या प्रवेशप्रक्रियासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं राज यांनी वर्षा गायकवाड यांना सांगितलं. वर्षा गायकवाड यांनी या मुद्द्यावर उद्यापर्यंत कळवणार असल्याचं राज ठाकरेंना सांगितलं आहे.
या भेटीदरम्यान कोचिंग क्लासचे मालकांनी त्यांच्या मागण्या राज ठाकरेंकडे मांडल्या आहेत. या मागण्या सरकार दरबारी मांडण्यासाठी देखील या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांना विनंती केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
गरज भासली तर भाजपला देखील पाठिंबा देऊ; मायावती यांचं मोठ विधान
कोचिंग क्लासेस सुरु करा; क्लासेसचं शिष्टमंडळ राज ठाकरेंची घेणार भेट
सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत; शिवसेनेचा लक्ष्मण सवदींना टोला
शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी नवा कायदा; गृहमंत्र्यांची घोषणा
दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांच्या विक्री आणि आतषबाजीवर ‘या’ ठिकाणी बंदी