तुमच्यासारखे 288 आमदार भेटले तर मी काय महाराष्ट्र घडवेन तुम्ही पाहाच!

पुणे | तुमच्यासारखे 288 आमदार मला भेटले, तर मी काय महाराष्ट्र घडवेन ते तुम्ही पहाच, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आमदार शरद सोनवणे यां कौतुक केलं. ते जुन्नरमध्ये बोलत होते.

सोनवणे यांनी स्वतः 75 लाख रूपये खर्चून जुन्नरमध्ये स्टेडिअम बांधलं आहे. मी असे आमदार पाहिले आहेत की, ज्यांनी लोकांचे पैसे स्वतःच्या खिशात घातले. सोनवणेंनी मात्र लोकांसाठी खिशातला पैसा बाहेर काढला, असं कौतुकही राज यांनी केलं. 

दरम्यान, सोनवणेंनी बांधलेल्या श्रीकृष्ण रामजी तांबे (झांबरशेठ) स्टेडिअमची भव्यता पाहता महाराष्ट्रात असा आखाडा असेल असं वाटत नाही, असंही राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-20 वर्षांनी मोठ्या रवी शास्त्रीसोबत अफेअरची चर्चा; ‘एअरलिफ्ट’च्या अभिनेत्रीनं दिलं उत्तर

-…हे तर जनतेचं शोषण; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी सरकारला घरचा आहेर

-मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुणाला घाबरतात?; स्वतःच दिलं उत्तर…

-डॉल्बी कोण बंद करतंय बघूच; खासदार उदयनराजेंनी आवाज वाढवला

-राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांना आज तीव्रतेने आली ‘या’ गोष्टीची आठवण!