राज ठाकरे उगवता तारा आहे, एक संधी देऊन पाहूया का?

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे एक उगवता तारा आहे. त्यांना एकदा संधी देऊन पाहूया का?, असं राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी म्हटलं आहे. आपल्या फेसबुक अकाऊंटवरून त्यांनी अशा आशयाची पोस्ट लिहिली आहे. 

राज ठाकरेंना मराठी माणसाची होणारी कोंडी सहन होत नाही. अन्याय सहन न होणारा माणूस थोडा रागीट, स्पष्टवक्ता, कडक वाटतो पण आरामाचे आयुष्य सोडून मराठी माणसासाठी स्वतःवर शेकडो केसेस ओढवून घेणाऱ्या माणसाची तळमळही समजून घेतली पाहिजे, असं उपाध्येंनी लिहिलं आहे. 

दरम्यान, उपाध्ये मुलुंडला शरदांचे चांदणे कार्यक्रमासाठी जाताना रानडे रोडवरील फेरीवाल्यांच्या समस्या दिसल्या. त्यावरून त्यांनी फेसबुकवरही पोस्ट लिहिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-….तर बॉलिवूडमधील या मुलीशी झालं असतं राजीव गांधींचं लग्न!

-बाळासाहेबांची खुर्ची मिळाली नाही म्हणून राज ठाकरे तोडफोड करतात!

-उत्तर प्रदेशात ब्राम्हणांवर अत्याचार होत आहेत; मायावतींचा आरोप

-नाना पाटेकर चिंधी अॅक्टर आहे- तनुश्री दत्ता

-प्रिया दत्त यांची काँग्रेसच्या सचिव पदावरून हकालपट्टी!