…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित

मुंबई | माझं आधीचं नाव स्वरराज होतं. बाळासाहेबांच्या सांगण्यावरून मी राज या नावाने व्यंगचित्र काढू लागलो, असा खुलासा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. ते एबीपी माझाच्या ‘ऐसपैस गप्पा राजकाकांशी’ या कार्यक्रमात ते बोलत आहेत. 

मी सुरुवातीला स्वरराज ठाकरे नावानं व्यंगचित्रं काढायचो. व्यंगचित्रातील माझ्या कारकिर्दीची सुरुवात त्याच नावानं झाली होती. मात्र सहा-आठ महिन्यांतच मला बाळासाहेबांनी नावात बदल करायला सांगितला, असं त्यांनी सांगितलं. 

मी व्यंगचित्राच्या क्षेत्रातील कारकीर्द ‘बाळ ठाकरे’ नावानं सुरू केली. त्यामुळे तू राज ठाकरे नावानं व्यंगचित्रं काढ, असं बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं. तेव्हा माझ्या नावाचं बारसं झालं, ही लहानपणीची आठवण त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, यासोबत त्यांनी लहानपणीच्या अनेक अाठवणींना उजाळा दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

-माणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे

-भारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी

-दुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार!

-तृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी

-दिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा