बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सागर बंगल्यावर राज ठाकरे-फडणवीसांमध्ये खलबतं; चर्चांना उधाण

मुंबई । राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. मात्र अजुनही नेत्यांचं पक्ष बदलाचं सत्र काही थांबताना दिसत नाही. यासोबतच महापालिका निवडणुकाही तोंडावर आल्या आहेत .अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली आहे.

राज ठाकरे काही महिन्यांपुर्वीच “शिवतिर्थ” या त्यांच्या नवीन वास्तुमध्ये रहायला गेले आहेत. आता गणेशोत्सवदेखील जवळ आला आहे. त्यांच्या या नवीन निवासस्थानी पहिल्यांदाच गणपती बसणार आहेत. गणेशोत्सवाला फडणवीसांनी सहकुटुंब यावं यासाठी आमंत्रण देण्यासाठी ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतल्याचं समजत आहे.

भेटीमध्ये इतर काय चर्चा झाल्या हे मात्र अजुनही गुलदस्त्यातच आहे. मात्र दोघांमध्ये तासभर झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More