‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र

मुंबई | अवनी वाघिणीला मारल्याचे प्रकरण हाताशी घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर टीका करणारे व्यगंचित्र काढले आहे. फेसबुक आणि ट्विटरवरून हे व्यंगचित्र त्यांनी पोस्ट केलं आहे. 

2018 मध्ये अवनी वाघिणीला मारलं. आता 2019 मध्ये महाराष्ट्र नावाचा वाघ सरकारचा फडशा पाडेल, असा संदर्भ असलेलं हे व्यंगचित्र आहे.

या व्यंगचित्रात दोन घटना दाखवल्या आहेत. पहिल्या घटनेत 2018 सालात मुख्यमंत्री, सुधीर मुनगंटीवार आणि उद्धव ठाकरे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हातात ‘माज’ टॅग असलेली बंदुक आहे. त्या बंदुकीने अवनी वाघिनीला मारलं आहे.

दुसऱ्या घटनेत 2019 सालात ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ मुख्यमंत्री आणि युती म्हणजेच उद्धव ठाकरेंवर झडप घालत आहे. ते स्वतःला वाचवत आहेत. तर मुनगंटीवार झाडावर चढून आपला जीव वाचवत आहे. या सर्वात ‘माज’ बंदुक जमिनीवर पडलेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार

-जिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू!

-संघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही!

-महाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का?; शिवसेनेचा सरकारला सवाल

-राम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल