बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘जर ‘या’ नियमांचा भंग झाला तर कलम 144 लागू करणार’; विश्वास नांगरे पाटलांचा इशारा

मुंबई | सध्या राज्यात गणेशोत्सवाची जोरदार तयारी चालू आहे. कोरोना महामारीचं सावट असलं तरी राज्यातील गणेशोत्सव नियम पाळुन साजरा होत आहे. राज्यातील मानाच्या आणि प्रसिद्ध गणपती मध्ये लालबागच्या राजाचं आगमन होत असतं. लालबाग राजाच्या दर्शनासाठी गर्दी होवू नये म्हणुन पोलीस काळजी घेत आहेत.

लालबागचा राजाची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे. या भागात गर्दी होवू नये म्हणुन मुंबई पोलीस आपली पुर्ण तयारी करत असल्याचं मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील स्पष्ट केलं आहे. तब्बल एक तास लालबागचा राजा गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि नांगरे पाटील यांच्यात बैठक झाली.

बैठकी नंतर नांगरे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी नांगरे पाटील म्हणाले की, कलम 144 खाली दुकानं बंद ठेवण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी दिले होते. मात्र, मंडळाशी चर्चा केल्यानंतर असं ठरलं आहे की, दुकानात फक्त दोन जणांना मंडळ आणि मुंबई पोलिसांकडून पास दिला जाईल. आरतीलाही फक्त 10 लोकांना परवानगी असेल. जर या नियमांचा भंग झाला तर पुन्हा कलम 144 चे आदेश लागू करण्यात येतील, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान, लालबागचा राजा गणपतीवर नागरिकांची असलेली श्रद्धा लक्षात घेता पोलीस काळजी घेत आहेत. भाविकांना मुखदर्शन घेता येणार नाही. मात्र, ऑनलाईन दर्शन सुरू आहे. यावर्षी भाविकांना काळजीपुर्वकचं गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे.

थोडक्यात बातम्या 

धक्कादायक! अमेरिकेत शाळा सुरू होताच ‘इतक्या’ लाख मुलांना कोरोनाची लागण

‘या’ भीतीमुळे अमरावतीमधील संपूर्ण गाव रात्रभर झोपलं नाही

पुण्यातील धक्कादायक घटना; नर्सचा ड्रेस परिधान करुन महिलेने पळवलं बाळाला

करदात्यांसाठी मोठी बातमी; इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली

IND vs ENG: कोरोनाच्या भीतीमुळे वरिष्ठ खेळाडूचा पाचवी टेस्ट खेळण्यास नकार?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More