Rajan Vichare | ठाणे लोकसभा मतदारसंघात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नरेश म्हस्के यांच्या विरोधात ठाकरे गटाचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ठाकरे गट विरूद्ध एकनाथ शिंदे शिवसेना अशी प्रतिष्ठेची लढत ठाणे लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. ठाण्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. पत्रकार परिषद घेऊन आता ठाकरे गटाचे नेते राजन विचारे (Rajan Vichare) यांनी एकनाथ शिंदे यांचे उमेदवार नरेश म्हस्केंबाबत मोठा गोप्यस्फोट केला आहे.
नरेश म्हस्के हा काँग्रेस पक्षामध्ये जात होता. त्याला मी जाण्यास नकार दिला होता. त्याचा शिवाजी मैदानावर प्रवेश होता. मात्र त्यावेळी मी त्याला जाण्यापासून रोखलं होतं, असा दावा राजन विचारे (Rajan Vichare) यांनी केला. आनंद दिघेंच्या मृत्युनंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या संपत्तीची चोकशी केल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला, असं राजन विचारे (Rajan Vichare) म्हणाले होते.
“मला त्यांनी वाऱ्यावर सोडलं होतं”
पत्रकार परिषेद घेतल्यानंतर राजन विचारे (Rajan Vichare) यांनी 2014 चा किस्सा सांगितला. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यासह सैन्य घेऊन ते कल्याणला गेले होते. तेव्हा मला त्यांनी वाऱ्यावर सोडलं होतं. तरीही मी ती निवडणूक निवडून आलो होतो. त्यावेळी वृत्तपत्रांमध्ये बातम्या देखील आल्या होत्या. केवळ ते आणि त्यांचा मुलगा एवढंच त्यांना माहिती होतं. माझ्याकडे खोके नव्हते मी आनंद दिघे आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे जिंकून आलो, असं राजन विचारे म्हणाले.
“आनंद दिघेसाहेबांमुळे ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला बनला”
आनंद दिघेसाहेबांमुळे ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला बनला होता. मी 40 वर्षे झालं आनंद दिघे यांच्यासोबत आहे. यांचा उदय झाला तो दिघे साहेब गेल्यानंतरच. त्यावेळी दिघेसाहेब मातोश्रीला यादी पाठवायचे आणि तिकीट फायनल व्हायचं, असं राजन विचारे म्हणाले.
माझ्याकडे पैसे नव्हते. मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे. मी त्यांच्यासाठी सभागृह पद सोडलं होतं. तुम्ही दिघेंवर चित्रपट केला. पैसे कुठे खर्च झाले. मी शो घेतले कार्यकर्त्यांच्या पैशाने चित्रपट काढला. ठाणे महापालिकेची वाट तुम्ही लावली आणि तुम्ही काय बोलत आहात? असा सवाल करत राजन विचारे यांनी विरोधक उमेदवार आणि शिंदेंना खडेबोल सुनावले आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शिंदेंचे निकटवर्तीय नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली. तर ठाकरे गटातून सध्याचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात मतदार कोणाच्या बाजूने आपला कौल देणार हे पाहणं गरजेचं आहे.
News Title – Rajan Vichare Salm To Eknath Shinde And Naresh Mhaske Thane Loksabha Election 2024
महत्त्वाच्या बातम्या
पुढील 3 दिवस धोक्याचे; हवामान विभागाने दिला अत्यंत महत्त्वाचा इशारा
‘पुण्यात कमळच, मोदींसाठी मोहोळच’; योग्य लाईनवर सुरु असलेल्या प्रचारानं भाजपचं पारडं जड
दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
समंथाचे नको तसले फोटो सोशल मीडियावर व्हायरल!
बायको म्हणावी की कसाई; नवऱ्याला बांधून ठेवलं नंतर प्रायव्हेट पार्टला दिले चटके