Top News पुणे

अजितदादांना मुख्यमंत्री बनलेलं बघायचंय, राखीपोर्णिमेनिमित्त बहिणीची इच्छा

पुणे | मोठ्या उत्साहात आज देशात सर्वत्र रक्षाबंधनाचा सण साजरा केला गेला. बहिण आणि भावाचं नातं या सणाने अजूनच घट्ट होतं या निमित्ताने राजकीय क्षेत्रासह अवघ्या महाराष्ट्रात ‘दादा’ म्हणूनओळखळे जाणारे अजित पवार यांच्या बहिणीने खास इच्छा बोलून दाखवली आहे. अजित पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्हाला पाहायची इच्छा आहे, असं त्यांची बहीण डॉ. रजनी इंदुलकर असं म्हणाल्या आहेत.

रक्षाबंधनाच्या निमित्त डॉ. रजनी इंदुलकर यांनी ‘लोकमत’शी बातचीत केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एकदिवस पंतप्रधानपदी बघायचं असल्याचंही त्या म्हणाल्यात. त्याचप्रमाणे अजितदादांना सुद्धा मुख्यमंत्री म्हणून पाहायचंय. आमच्या सर्वांच्या मनातील इच्छा एक दिवस पूर्ण व्हावी अशी आशा आहे, असं डॉ. रजनी इंदुलकर यांनी म्हटलंय

डॉ. रजनी इंदुलकर म्हणाल्या, “दादा तुम्ही फक्त आमच्यासाठी नाही तर समस्त कार्यकर्त्यांसाठी, न ओळखीच्या माणसांसाठी, लाखो-लाखो महाराष्ट्रातच्या लोकांसाठी कामं केलीयेत. सतत तुम्ही त्यांना काही तरी देत आला आहात. कधीतरी आपल्या मनात काय आहे, काय चाललंय किंवा आपलं दु:ख काय आहे, ते कधीतरी शेअर करा.”

अजित दादा तुमचंही काही टेन्शन असतील ते शेअर करायला आवडेल. तुम्ही हे आतापर्यंत केलं नाही. नेहमी एक चांगला हसरा चेहरा घेऊन आमच्यासमोर आलात. तर हीच आमची इच्छा आहे की, तुमची दुख:ही काही असतील छोटी-मोठी ती हलकी करायची आम्हा बहिणींनी संधी मिळाली तर बरं होईल.” अशी भावना बोलून दाखवली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘कोरोनावरची लस आली तरी…’; WHO प्रमुखांच्या वक्तव्यानं जगाचं टेन्शन वाढलं

रोहित पवारांचं अनोखं रक्षाबंधन, कोरोना वॉरियर्स बहिणींकडून बांधून घेतली राखी!

मनसेच्या अविनाश जाधवांना दिलासा नाहीच, जामीन अर्ज फेटाळला!

वर्दीतलं रक्षाबंधन…. ‘महिला कर्मचाऱ्यांचा मोठा भाऊ म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा!’

सम-विषम फॉर्म्युला बंद, मुंबई महापालिकेचा दुकानांनबाबत महत्त्वपूर्ण निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या