माझ्या नको, आई-वडिलांच्या पाया पडा- रजनीकांत

चेन्नई | सुपरस्टार रजनीकांत यांच्या मोठेपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. माझ्या पाया पडू नका, स्वतःच्या आई वडिलांच्या पाया पडा, अशी विनंती सुपरस्टार रजनीकांत यांनी आपल्या चाहत्यांना केलीय. 

कोडम्बक्कम येथे एका लग्नसोहळ्याला हजेरी लावल्यानंतर त्यांच्या पाया पडण्यासाठी चाहत्यांची गर्दी उसळली होती. त्यामुळे त्यांनी याठिकाणी बोलताना आपल्या चाहत्यांना ही विनंती केली.

आई-वडिलांमध्ये देवाचे रुप पाहा. त्यांच्यामध्येच देव पाहा आणि त्यांची सेवा करा, असंही रजनीकांत यावेळी म्हणाले.