भाजपाध्यक्ष झाले म्हणून कोर्टालाही खरेदी करणार का?

जयपूर | भाजप अध्यक्ष झाले म्हणून तुम्ही कोर्टालाही खरेदी करणार का? असा सवाल राजस्थान उच्च न्यायालायाने राजस्थान भाजपचे अध्यक्ष अशोक परनामी यांना केला. त्यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला सुरु आहे.

खटल्याच्या सुनावणीला परनामी यांनी हजेरी लावली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या न्यायाधीशांनी त्यांना दुपारी 2 वाजेपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले अन्यथा अटक वॉरंट काढलं जाईल, अशी तंबी दिली. 

अशोक परनामी यांनी न्यायालयात हजेरी लावली. त्यानंतर न्यायाधीशांनी त्यांना हा सवाल केला. त्यांच्या अनधिकृत कामांची परवानगी दिल्याचा आणि न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप आहे.