बलात्कार करणाऱ्यास फाशी, राजस्थान सरकारचा नवा कायदा

जयपूर | राजस्थानमध्ये 12 वर्षाखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा देण्याचा कायदा मंजूर करण्यात आलाय. वसुंधराराजे सरकारने हा निर्णय घेतलाय. 

देशात अशा पद्धतीने कायदा करणारं राजस्थान पहिलंच राज्य नाहीये. यापूर्वी मध्य प्रदेश आणि हरियाणा राज्यातही असा कायदा तेथील सरकारने मंजूर केलेला आहे. 

राजस्थान विधानसभेत पारित करण्यात आलेला हा कायदा आता राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतरच या कायद्याला मूर्त स्वरुप मिळू शकेल.