तरुणींना टी-शर्ट घालण्यास बंदी, राजस्थान सरकारचा अजब फतवा

जयपूर | जगभर महिलादिन उत्साहात साजरा होत असताना राजस्थानात मात्र महाविद्यालयीन तरुणींना जिन्स-पॅन्ट आणि टी-शर्ट घालण्यास बंदी केली आहे. तसंच राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

२०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू करण्यात आला असून याचं पालन करणं सगळ्या महाविद्यालयांना बंधनकारक आहे.

माजी विद्यार्थी कॉलेजात येतात त्यामुळे महाविद्यालयीन वातावरण दूषित होत असल्याचा दावा उच्च शिक्षण मंत्री किरण महेश्वरी यांनी केला आहे.