राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची आघाडी, पाहा काय आहेत पहिले कल

नवी दिल्ली | पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या कलांमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. 

राजस्थानमध्ये काँग्रेसने 20 तर भाजपने 11 जागांवर आघाडी घेतली आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने 15 तर भाजपने 13 जागांवर आघाडी घेतली आहे. 

छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर दिसतेय. भाजप 16 तर काँग्रेस 14 जागांवर आघाडीवर आहे. 

तेलंगणामध्ये चंद्रशेखर राव यांच्या टीआरएसने आघाडी घेतली आहे. याठिकाणी टीआरएस 3 तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे. मिझोराममध्ये काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे. 

महत्वाच्या बातम्या –

-ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवत असाल तर एकदा हा धक्कादायक व्हीडिओ नक्की बघा…

-उर्जित पटेल यांचा राजीनामा प्रत्येक भारतीयासाठी चिंतेचा विषय- रघुराम राजन  

-70 वर्षात जे घडलं नाही ते आता घडलं; याचं श्रेय फक्त मोदींना- जितेंद्र आव्हाड

-अखेर विजय मल्ल्याचा खेळ खल्लास; लवकरच मल्ल्याला भारतात आणणार!

-धुळे महापालिकेच्या विजयी उमेदवारांची यादी जाहीर, पाहा कोण कोण जिंकलं…