बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजस्थानचा कोलोकातावर विजय, संजू सॅमसंगची नाबाद संयमी खेळी

मुंबई | कोलकाता आणि राजस्थानमधील सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने विजय मिळवला आहे. कोलकाताच्या 134 धावांचा पाठलाग करताना राजस्थानने आपले 4 गडी गमावत लक्ष्य पुर्ण केलं. यामध्ये राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसंगने नाबाद 42 धावांची संयमी खेळी करत विजय संपादन केला.

या आयपीएलचा महागडा खेळाडू ख्रिस मॉरिसच्या 4 बळींमुळे कोलकाताला 20 षटकात 9 बाद 133 धावांपर्यंतच मजल मारता आली. कोलकाताकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक 36 धावांचं योगदान दिलं. कोलकाताच्या बाकी फलंदाजांना साजेशी खेळी करता आली नाही. कोलकाताचा हा सगल चौथा पराभव आहे.

राजस्थान संघाकडून फलंदाजीमध्ये बदल करण्यात आला. मनन वोहराच्या जागी जयस्वालला संधी देण्यात आली. त्याने संधीचा फायदा घेत 22 धावांची छोटेखानी खेळी केली. बटरलला चक्रवर्तीने बाद केलं त्यानंतर शिवम दुबे आणि संजूने डाव सावरला. मात्र त्यानंतर चक्रवर्तीने पुन्हा दुबेला बाद करत संघाच्या आशा कायम ठेवल्या. दुसरीकडे संजूने एक बाजू लावून धरली होती. मात्र कमी धावसंख्येमुळे राजस्थानने सहज विजय मिळवला.

दरम्यान, उद्याच्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. एकही पराभव नसलेल्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांमध्ये उद्या दुपारी सामना रंगणार आहे. विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

थोडक्यात बातम्या- 

पीपीई किट घातलेला मृतदेह महामार्गालगत पडलेला, महाराष्ट्रातील घटनेनं खळबळ

पंतप्रधान हे देशासाठी पित्यासमान आहेत- कंगणा राणावत

आज पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

लॅाकडाऊनमुळं नोकरी गेली, कुटुंबावर स्मशानात राहण्याची वेळ; काम ऐकाल तर तुम्हाला अभिमान वाटेल!

अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल, FIR मध्ये अत्यंत धक्कादायक माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More