बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लस काय झाडाला लागल्यात का? केंद्र सरकारने हव्या तितक्या तोडून द्यायला”

जयपूर | येत्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कोरोना नियंत्रीत करण्यासाठी सध्या लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडविया यांनी लसीकरणावर भर देण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या होत्या. पंरतू काही राज्यात लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यातच आता भाजपच्या नेत्यानं एक अजब वक्तव्य केलं आहे.

राजस्थानामध्येही लोक लसीकरणाला प्रतिसाद देत असल्यानं कोरोना लसींची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे आता लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी वांरवार लसीकरण तुटवड्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. राजस्थानला केंद्र सरकारने पुरेशा प्रमाणात लस दिल्या नसल्याचा आरोप गहलोत यांनी केला होता. त्यावर आता राजस्थान भाजपचे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी गहलोत सरकारवर टीका केली आहे.

कोरोना प्रतिबंधक लस काही झाडाला लागलेल्या का? की केंद्र सरकार हव्या तितक्या तोडून देऊ शकेल, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी विचारला आहे. गेल्या काही दिवसांपासून अशोक गहलोत आणि गुलाबचंद कटारिया यांच्यात वाकयुद्ध सुरू आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता कटारिया यांच्यावर सर्वजण टीका करताना दिसत आहे.

दरम्यान,केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारने आतापर्यंत केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना 43 कोटी 79 लाख 78 हजार 900 लसी वितरीत करण्यात आल्या आहेत, त्यापैकी 40 कोटी 59 लाख 77 हजार 410 लसींचा वापर झाला आहे. याची स्वतंत्र आकडेवारी देखील केंद्राने जाहीर केली आहे. तर 3 कोटी 20 लाख 01 हजार 490 लसींचे डोस शिल्लक आहेत.

थोडक्यात बातम्या-

भारताला मिळू शकते आणखी एक लस; ‘या’ लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता

‘एमपीएससी’चा मोठा निर्णय!; ‘या’ उमेदवारांना प्रमाणपत्र सादर करावं लागणार

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना आजही पाऊस झोडपणार; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

“मदत का पोहोचली नाही?, सरकार काय करतंय? असे प्रश्न विचारायचे असतील तर…”

सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावात भूस्खलन; गावातील नागरिकांना हलवण्याचे आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More