बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑनलाईन संवाद साधताना लॉकडाऊन शब्दच विसरले मुख्यमंत्री, व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली | देशभरात कोरोनाने हैदोस घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देशाची झोप उडाली आहे. या लाटेला थोपवण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा युद्ध पातळीवर काम करत आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी लॉकडाऊनच्या सूचना दिल्या आहेत आणि निर्बंधांचं पालन करण्यासाठी मुख्यमंत्री जनतेला सांगत आहेत. अशाच प्रकारे जनतेशी संवाद साधताना राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊन हा शब्दच आठवला नाही. त्यामुळे त्यांची फजिती झाली आहे.

राजस्थानमध्ये सध्या 3 मे ते 17 मे पर्यंत ‘जनअनुशासन पखवाड़ा’ सुरु आहे. त्याअंतर्गंत येथे लॉकडाऊनसारखेच नियम लागू करण्यात आले आहेत. लॉकडाऊन असल्याप्रमाणेच हे नियम पाळावेत असे यावेळी गेहलोत सांगत होते. मात्र, यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांना लॉकडाऊन हा शब्दच आठवत नव्हता.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा हा व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला आहे. लॉकडाऊन शब्द आठवत नसल्यामुळे त्यांनी शेवटी चक्क डोक्याला हात लावला. ऑनलाईन संवाद साधत असताना त्यांना हा शब्द न आठवल्याने त्यांची फजिती झालेली पाहायला मिळाली.

दरम्यान, शब्दच आठवत नसल्यामुळे पुढे काय बोलावं हे त्यांना समजतच नव्हतं.  मात्र सोशल मीडियावर अशोक गेहलोत यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

भाजपने माजी खासदार संजय काकडे यांच्याकडे सोपवली ही मोठी जबाबदारी

“कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक घातक

काय सांगता! हनीमूनच्या रात्री नवरदेवाला खोकणं पडलं महागात, नवरीने केलं असं की….

धक्कादायक! वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू, लेकीची जळत्या चितेत उडी

“आमच्यासोबत यावं अन् मराठा आरक्षणाच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More