Top News

‘हवे तितके पैसे घ्या पण भाजपत या’; भाजपनं ऑफर दिल्याचा ‘या’ काँग्रेस आमदाराचा दावा

जयपूर | राजस्थानात राजकीय घटनांना प्रचंड वेग आला आहे. नाराज झालेल्या सचिन पायलट यांनी दिल्ली गाठली आहे. यावरून मध्य प्रदेशात कमलनाथ यांचं सरकार अशाच पद्धतीनं कोसळलं होतं. तसं काही राजस्थानात होतं की काय? यावरून बरेच तर्कविर्तक सुरू आहेत.

राजस्थान काँग्रेसनं व्हिप काढत पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला उपस्थित असलेल्या एका काँग्रेस आमदारांनं भाजपकडून ऑफर देण्यात आल्याचा दावा केलाय.

भाजपनं पक्षात येण्याची ऑफर दिल्याता दावा काँग्रेसचे आमदार राजेंद्र गुडा यांनी केला आहे. तसेच हवे तितके पैसे घ्या पण भाजपत या, अशी ऑफर देण्यात आली होती, अशी महिती राजेंद्र गुडा यांनी दिली आहे.

काँग्रेसचे आमदार पक्षात यावेत म्हणून भाजपाकडून पूर्ण प्रयत्न केले जात असल्याचा दावाही गुडा यांनी केला आहे. गुडा हे बसपातून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसमध्ये दाखल झालेले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची मुलाखत घ्यावी, बघू ते मुलाखत देतात का?- संजय राऊत

धक्कादायक! भाजप मंत्र्याच्या मुलाला रोखल्यामुळे पोलिस महिलेला द्यावा लागला राजीनामा

महत्वाच्या बातम्या-

पुणेकरांनो आतातरी घरी बसा, आयसीयू, ऑक्सिजन अन् बेडही नाहीत!

‘नया है वह’ म्हणत फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर टीका, संजय राऊतांचं फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर

खळबळजनक! भाजप आमदाराचा फास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या