Mahatma Gandhi Jawahrlal Nehru - राजस्थानमध्ये शालेय इतिहासातून गांधी-नेहरुंना वगळलं!
- देश

राजस्थानमध्ये शालेय इतिहासातून गांधी-नेहरुंना वगळलं!

मुंबई | इतिहास बदलण्याच्या कारणावरुन भाजप सरकार वादात सापडले असतानाच आता राजस्थानमधून धक्कादायक माहिती समोर आलीय. इतिहासाच्या पुस्तकांतून चक्क गांधी आणि नेहरुंना वगळण्यात आलं आहे. 

इयत्ता ८ वीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात देशाचे पहिले पंतप्रधान कोण सांगण्यात आलेलं नाही. महात्मा गांधींच्या हत्येबाबतही या पुस्तकात उल्लेख नाही.

१० वी आणि १२ वीच्या पुस्तकात महात्मा गांधींचा उल्लेख आहे, पण नेहरूंचा नाही. तसचे ११ वीच्या पुस्तकात काँग्रेसचा उल्लेख इंग्रजांनी जन्माला घातलेली संस्था असा करण्यात आला आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा